भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
भरतीचे नाव – भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती २०२६
पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
पदसंख्या – 105 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – कमाल 28 वर्षे
अर्ज शुल्क – ₹500/-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
पदांचा तपशील
- ज्युनियर रिसर्च फेलो – 105 जागा
शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. मध्ये किमान 60% आणि M.Sc. मध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक.
- पाच वर्षांचा इंटिग्रेटेड M.Sc. / B.S.-M.S. (Dual Degree) पूर्ण केलेल्या उमेदवारांनी किमान 55% गुण मिळवलेले असावेत.
- चार वर्षांचा / आठ सेमिस्टरचा बॅचलर डिग्री (B.S. with Research) केलेल्या उमेदवारांना एकूण किमान 75% गुण असल्यास अर्ज करता येईल.
वेतनश्रेणी
- पहिली दोन वर्षे – ₹37,000/- प्रति महिना स्टायपेंड
- तिसरे वर्ष – ₹42,000/- प्रति महिना स्टायपेंड
- पाच वर्षांच्या कालावधीत – ₹60,000/- प्रति महिना स्टायपेंड (नियमांनुसार)
अर्ज कसा करावा
- वरील पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- अर्ज सादर करण्याची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण भरावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात – https://shorturl.at/GCpoU
ऑनलाईन अर्ज – https://shorturl.at/pSePN
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
ही माहिती इच्छुक उमेदवारांनी आपल्या मित्रांसोबत शेअर करावी. अधिक सरकारी नोकरी अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.