महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६ – 24 जागांसाठी संधी
Maharashtra Police अंतर्गत विधी अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 24 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भरतीची थोडक्यात माहिती
पदाचे नाव: विधी अधिकारी (गट ब) व विधी अधिकारी
एकूण पदसंख्या: 24 जागा
नोकरी ठिकाण: ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
वयोमर्यादा: कमाल 60 वर्षे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट: www.mahapolice.gov.in
पदनिहाय रिक्त जागा
पदाचे नाव पदसंख्या विधी अधिकारी (गट ब) 04 पदे विधी अधिकारी 20 पदे
शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी (गट ब)
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व सनदधारक असावा.
किमान 5 वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव आवश्यक.
गुन्हेगारी, सेवाविषयक, प्रशासनिक कायदे तसेच विभागीय चौकशी बाबत सखोल ज्ञान असणे आवश्यक.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.
शासकीय सेवेत विधी विषयक कामाचा अनुभव असल्यास तो ग्राह्य धरला जाईल; मात्र सध्या शासकीय सेवेत कार्यरत असलेली व्यक्ती अपात्र राहील.
विधी अधिकारी
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा.
किमान 5 वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव आवश्यक.
संबंधित कायद्यांचे सखोल ज्ञान आवश्यक.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.
शासकीय सेवेत विधी विषयक अनुभव असल्यास ग्राह्य; परंतु सध्या शासकीय सेवेत असलेले उमेदवार अपात्र.
वेतनश्रेणी
पदाचे नाव वेतन विधी अधिकारी (गट ब) रु. 25,000/- प्रतिमाह + रु. 3,000/- (दूरध्वनी व प्रवास खर्च) विधी अधिकारी रु. 20,000/- प्रतिमाह + रु. 3,000/- (दूरध्वनी व प्रवास खर्च)
इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत.
अर्ज कसा करावा?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कूलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)
लिफाफ्यावर स्पष्टपणे “विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज” किंवा “विधी अधिकारी पदासाठी अर्ज” असे नमूद करावे.
प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक.
अर्जासोबत 2 पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावेत.
अर्ज 09 मार्च 2026 पूर्वी पोहोचणे आवश्यक.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (50 गुण)
तोंडी मुलाखत (25 गुण)
लेखी व तोंडी परीक्षेतील एकत्रित गुणांनुसार निवड केली जाईल.
किमान 60% गुण आवश्यक.
लेखी परीक्षेतून पदांच्या तीनपट उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल.
परीक्षेची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येईल.
प्रवास खर्च देण्यात येणार नाही.